Featured post

இன்ஸ்பெக்டர் ரிஷி’ - பிரைம் வீடியோ இந்தியாவில்

 *‘இன்ஸ்பெக்டர் ரிஷி’ - பிரைம் வீடியோ இந்தியாவில் அதிகளவு பார்க்கப்பட்ட தமிழ் ஒரிஜினல் தொடர் எனும் சாதனையைப் படைத்திருக்கிறது*     நந்தினி ஜ...

Wednesday 22 July 2020

खून आणि बलात्काराची धमकी देणाऱ्या ऑनलाइन ट्रोलर्स


खून आणि बलात्काराची धमकी देणाऱ्या ऑनलाइन ट्रोलर्स विरूद्ध कायदेशीर कारवाई करणार सेलिब्रिटी



सोशल मीडियाची निर्मिती एका सुंदर स्वच्छ विचाराने झाली होती. काही वर्षांपूर्वी सगळं काही ठीक होत पण हल्ली परिस्थिती हात बाहेर गेली आहे. सोशल मीडिया साईट्सचा लोक आपल्या आयुष्यातील काही माहितीपूर्ण आणि सकारात्मक गोष्टी घटना लोकांपुढे आणि त्यांना देखील प्रिंटसाठी करण्यासाठी करायचे पण आता या माध्यमाचे रूपांतर एका जर राक्षसाचा झाले आहे. काही समाज कंटक आज या माध्यमाचा उपयोग लोकंविरोधतात काट-कारस्थान करण्यासाठी वापरतात. जरी याचा आघात शारीरिक नसला तरी मानसिक भावनात्मकदृष्ट्या अश्या गोष्टी खूप त्रास देतात.
ऑनलाईन ट्रोलिंग आणि गुंडगिरी ही बर्याच लोकांसाठी गंभीर समस्या बनली आहे, विषेशतह समाजात एक स्थान असणाऱ्यांसाठी आणि ते नेहमीच टिकेचे धनी धरतात।
सेलीब्रेटींना नेहमीच अश्या असंवेदनशील संदेशांना समोर जावं लागत मुळात लिहिणार्यांना वाटतं कि त्यांना समोरच्याला धमकी देण्याचा पूर्ण अधिकार आहे. हि गोष्ट फक्त लिखित संदेशांची नाहीये, ट्रॉलर्स आता खालच्या पातळीवर जाऊन शारीरिक इजा पोहोचविण्याच्या धम्या हि देऊ लागले आहेत.
सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू लक्षात घेता लोकांनी घराणेशाहीच्या चर्चेला वेगळाच वळण दिले आहे. यामुळे करण जोहर, आलिया भट्ट, सलमान खान, सोनम कपूर आदी सेलेब्रिटींना सोशल मीडियावरुन सतत ऑनलाईन द्वेषाचा सामना करावा लागत आहे.
अलीकडेच आलिया भट्ट आणि शाहीन भट्टदेखील ट्रॉल्सच्या  निशाण्यावर पाहायला मिळाल्या, पण शाहिनने हिमतीने सोशल मीडिया ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिले.  अश्याच एका प्रकारचा सामना अभिनेत्री  रिया चक्रवर्तीला अनुभवायला मिळाला, हि बाब तिने तिच्या सोशल प्लॅटफॉर्मवरुन समोर आणली.

सूत्रांच्या अनुसार, करण जोहर, ज्याने या ट्रोलर्सचा अधिक सामना केला आहे, आता त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याची तयारी करीत आहे. भारतीय राज्यघटनेचे पालन करत तो  कायदेशीर मार्गांनी त्यांच्या वकीलांचा सल्लाही घेत आहे.
करण जोहर यांच्या निकटवर्तीयातील एक सूत्र म्हणतो, "करण सक्रियपणे कायदेशीर कारवाईचा पाठपुरावा करीत आहे. वकिलांची टीम तसेच ऑनलाईन तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ एकत्र येऊन या घटनांचे विश्लेषण करीत आहेत. टीमचे तांत्रिक लोक सोशल मीडिया हँडल्सचा मागोवा घेत आहेत. ही खाती, बनावट आहेत कि वास्तविक याचा शोध घेऊन ते संबंधित अधिकाऱ्यांकडे पुरावे देण्याची तयारी करीत आहेत. जेव्हा लोक कारणांच्या मुलांना शारीरिक धमकी देण्याची धमकी देऊ लागले आणि त्यांच्या आईवर बलात्कार करण्याची धमकी दिली तेव्हा हे ट्रोलिंग हाताबाहेर गेले कारण ला हि सहन झाले नाही. "
कई अन्य हस्तियों ने इसी तरह के विषयों पर एफआईआर दर्ज की है जब वे ऐसे मानसिक रूप से खतरनाक साइबर-क्राइम के शिकार थे। पुलिस ने इन शिकायतों को बहुत गंभीरता से लिया है और पुरे स्थिति की गहन जांच कर रही है।
या आधी हि अनेक सेलिब्रिटींना जेव्हा अश्या साइबर-क्राइमचा शिकार व्हावं लागले तेव्हा त्यांनी देखील एफआयआर दाखल केल्या होत्या आणि आता पोलीस देखील गंभीर झाले आहेत. या सर्व बाबींची पोलीस कठोर चौकशी करणार आहेत.
भारतीय कायद्याच्या कलम 67 आणि आयपीसीच्या कलम 7 नुसार जर कोणी व्यक्ती सोशल मीडियावर शिवीगाळ किंवा हिंसक संदेश देत असेल तर त्याला लाखो रुपयांच्या दंड तुरूंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
 


No comments:

Post a Comment